कुरकुरीत कांदा भजी

Print Recipe
ही एक गोष्ट वापरून बनवा खमंग कांदा भाजी जी तुम्ही खातच राहाल
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. कांद्याची साले काढून कांदे पातळ उभे चिरून घ्यावेत.
  2. हाताने चुरून कांदा मोकळा करून घ्यावा.
  3. कांद्याला मीठ, हिरवी मिरची व आले घालून मिक्स करावे व १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
  4. १५ मिनिटांनंतर कांद्याला पाणी सुटेल. आता यात हळद व कोथिंबीर घालावी.
  5. थोडे-थोडे करत बेसन घालावे व मिक्स करावे.
  6. १ चमचा पाणी घालून सर्व मिक्स करावे.
  7. कढईत तेल चांगले गरम करावे व गॅस मध्यम वर ठेवावा.
  8. एका बाऊलमध्ये पाणी ठेवावे.
  9. पाण्याने हात थोडा ओला करावा व छोटी छोटी भजी तळून घ्यावीत.
  10. दोन्ही बाजूने भजी नीट तळून घ्यावीत.
  11. टिशू पेपरवर तेल निथळून भजी काढावीत.
  12. गरमागरम भजी चहासोबत सर्व्ह करावी.
Recipe Notes
  1. भजी तळताना तेल चांगले गरम हवे.
  2. जास्त पाणी घालू नये भजी मऊ पडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *