Print Recipe
५ मिनिटात झटपट तयार होणारी तिळाची वडी
Instructions
- तीळ चाळून, निवडून घ्यावेत. नंतर कोरडेच कढईमध्ये भाजून घ्यावे.
- १ चमचा तूप पोळपाट व लाटणे याला लावुन घेणे.
- एका नॉनस्टिक पॅनमध्ये साखर वितळत ठेवणे. गॅस मंद ठेवणे.
- साखर वितळली की त्याचा रंग थोडासा बदलतो. आता यांत १ चमचा तूप व भाजलेले तीळ घालून परतून घेणे.
- पटापट चांगले मिक्स करावे व गॅस बंद करावा.
- हे मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर ओतावे व लाटणीने लाटून लगेचच हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात.
- सर्व क्रिया खूप पटापट करावी नाहीतर मिश्रण सुकेल.