फणसाची भाजी

Print Recipe
माझ्या सासूबाईंच्या रेसिपी ने बनवलेली फणसाची चविष्ट भाजी
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. फणस सोलण्या अगोदर हाताला व सुरीला तेल लावणे म्हणजे हाताला डिंक लागत नाही व सोलणे सोपे जाते.
  2. फणसाची सगळी चारखंड वेगळी करून गरे बाजूला करणे व त्याचे तुकडे करून घेऊन फणस पाण्यात ठेवणे.
  3. घोट्या दगडाने ठेचून त्याची साल काढणे व पाण्यात ठेवणे.
  4. आल व मिरची मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवणे.
  5. पातेलीत तेल गरम करणे त्यावर मोहरीची फोडणी करणे. मोहरी तडतडली की हिंग व आल-मिरचीच वाटण घालून थोडे परतून घेणे.
  6. हळद व ठेचलेल्या घोट्या घालून परतून घेणे. १/२ पेला पाणी घालून झाकण ठेवून ५ मिनिटांसाठी घोट्या शिजवून घ्याव्यात.
  7. आता गरे घालावेत त्यावर मीठ व साखर घालून पातेलीवर झाकण ठेवावे. झकणावर पाणी ठेवावे.
  8. वाफेवर ५ मिनिटांसाठी मंद गॅसवर भाजी शिजवावी.
  9. झाकण उघडून भाजी एकदा ढवळून घ्यावी व पुन्हा झाकून १ वाफ आणावी.
  10. ओल खोबर घालून मिक्स करवे व भाजी सर्व्ह करावी.
Recipe Notes
  1. कच्चा फणस सोलल्यानंतर लगेचच भाजी करावी नाहीतर गरे कडू होतात.
  2. भाजीत पाणी जास्तीचे घालू नये भाजी चिकट होते.
  3. भाजीसाठी शक्यतो रसाळ फणस वापरावा.
  4. सोललेले गरे लगेच वापरायचे नसतील तर हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे आठवडाभर चांगले राहतात.

One thought on “फणसाची भाजी”

Leave a Reply to Ashfaq Kazi Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *