Print Recipe
घरच्या मोजक्या सामानात तयार होणारा लवंग घातलेला चविष्ट शिरा
Instructions
- गॅसवर कढईत तूप गरम करणे.
- तुपावर लवंग घालून परतून घेणे.
- रवा स्वच्छ वेचून घेणे व लवंग तडतडली की तुपावर चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेणे.
- दूध व पाणी एकत्र करून उकळी आणावी व हे मिश्रण गरम असतानाच भाजलेल्या रव्यात घालणे.
- रवा आणि पाणी चांगले मिक्स करावे व मंद गॅसवर कढईत झाकण ठेवून ५ मिनिटांसाठी वाफेवर रवा शिजत ठेवावा म्हणजे रवा चांगला फुलतो.
- आता झाकण काढून पुन्हा मिक्स करावे त्यात मीठ, काजू व साखर घालून एकजीव करावे व झाकण ठेवून १ वाफ आणावी.
- वेलचीपूड घालून मिक्स करावी व गॅस बंद करावा.
- मुदाळने अथवा वाटीने शिऱ्याला छान आकार द्यावा.
Recipe Notes
- रवा मंद गॅसवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा म्हणजे चांगला फुलतो.
- दुधाऐवजी पूर्ण पाणी वापरले तरी चालते.