Print Recipe
कोकणातील प्रत्येक घरात गोकुळाष्टमीला बनणारी चविष्ट खीर
Instructions
- जाड बुडाचे पातेले गॅसवर गरम करावे.
- पातेल्यावर तूप घालावे व त्यावर रवा मंद गॅसवर छान गुलाबीसर परतून घ्यावा. सारखे हलवत रवा भाजून घ्यावा.
- दुसऱ्या पातेलीत दूध गरम करत ठेवावे.
- रव्यात काजू व बदाम छान परतून घ्यावे.
- रवा छान भाजला की गरम दूध घालून दुसऱ्या बाजूने हलवत छान एकजीव करावे.
- 5 मिनिटे मंद गॅसवर रवा शिजवून घ्यावा.
- आता यांत साखर व वेलचीपूड घालून पुन्हा 5 मिनिटांसाठी पातेलीवर झाकण ठेवून खीर शिजवून घ्यावी.