Print Recipe
चुलीवरची गावरान कोंबडी वडा
Servings |
|
Ingredients
मालवणी वडे साहित्य
- 2 कप तांदळाचे पीठ
- 2 कप ज्वारीचे पीठ
- 1 कप गव्हाचे पीठ
- 1/4 कप चणाडाळ
- 1/4 कप उडीद डाळ
- 1 चमचा धणे
- 1/4 चमचा मेथी
- 1/2 चमचा बडीशेप
- 10 दाणे मिरी
- 1/2 चमचा हळद
- 1 चमचा मीठ
चिकन सागोती साहित्य
- 1 कोंबडी गावठी चिकन
- 4 टीस्पून मालवणी मसाला
- 1/4 टीस्पून हळद
- 10-15 पाकळ्या लसूण
- आल
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- 1 मोठा कांदा उभा चिरलेला
- 1/2 सुका नारळ किसून
- 1/2 ओला नारळ किसून
Ingredients
मालवणी वडे साहित्य
चिकन सागोती साहित्य
|
|
Instructions
मालवणी वडे कृती
- चणाडाळ व उडीद डाळ २ पाण्याने स्वच्छ धुवून २ तासांसाठी गरम पाण्यात भिजत ठेवावी.
- धणे, मेथी, बडीशेप, मिरी कोरडेच भाजून घ्यावे व त्यांची मिक्सरवर बारीक पूड करावी.
- याच पुडमध्ये भिजवलेली उडीद डाळ व चणाडाळ देखील बारीक वाटून घ्यावी.
- तांदळाचे, ज्वारीचे व गव्हाचे पीठ एकत्र करावे त्यात हळद, मीठ घालून मिक्स करावे.
- पातेलीत पाणी गरम करून घ्यावे.
- मिक्स केलेल्या पिठात मिक्सरला लावलेली पेस्ट घालणे व गरम पाणी घालून पीठ मळून घेणे.
- पोळीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्यावे.
- मळलेल्या पिठाच्या मधोमध एक होल करावा त्यात गरम कोळसा घालून पीठ झाकून ठेवावे.
- २ तासांसाठी पीठ झाकून ठेवावे म्हणजे ते चांगले फुलते व वडे छान होतात.
- २ तासानंतर पिठातील कोळसा व त्याच्या बाजूचे थोडे पीठ काढून टाकावे.
- थोडेसे तेल घालून पीठ पुन्हा चांगले मळून घ्यावे व त्याचे गोळे करावे. उरलेले पीठ झाकून ठेवावे.
- केळीच्या पानाला किंवा प्लॅस्टिकला तेल लावून त्यावर १-१ गोळा ठेवून हाताने थोडेसे जाडसर वडे थापुन घ्यावेत.
- कढईत तेल चांगले गरम करावे व नंतर गॅस मध्यम करावा.
- वडे तेलात सोडावेत व झाऱ्याने हलकेच दाबावेत म्हणजे वडे मस्त फुगतात.
- वडा तेलात फुगला की परतून दुसऱ्या बाजूने देखील वडा भाजून घ्यावा. अशाप्रकारे सर्व वडे छान भाजून घ्यावेत.
चिकन सागोती कृती
- चिकन साफ करून स्वच्छ धुवून घ्यावे.
- आलं, लसूण व कोथिंबीर यांची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी.
- चिकनला हळद, मीठ, मालवणी मसाला (२ चमचे) व आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट लावून १/२ ते १ तास मॅरीनेट करणे.
- तव्यावर उभा चिरलेला कांदा थोडा परतून घेणे नंतर त्यात तेल घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेणे.
- यांत आता अर्धे ओले खोबरे घालणे. अर्धे ओले खोबरे रस करण्यासाठी बाजूला ठेवणे.
- ओले खोबरे थोडे परतले की सुके खोबरे घालणे व परतून घेणे.
- सर्व ब्राऊन होईपर्यंत परतून घेणे.
- भाजल्यानंतर खोबरे बाजूला करून मधे सर्व गरम मसाला घालावा व भाजून घ्यावा. सर्व चांगले मिक्स करावे व थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करावे.
- पातेलीत तेल तापल्यावर तमालपत्र व कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
- यांवर आता मॅरीनेट केलेले चिकन चांगले परतून घ्यावे. पातेलीवर झाकण ठेवावे यात पाणी ठेवावे व चिकनला १ वाफ आणावी.
- गरम झालेले झाकणावरील पाणी आत घालावे व चिकन शिजू द्यावे.
- १० मिनिटांसाठी झाकून चिकन शिजवावे.
- आता २ चमचे मालवणी मसाला घालावा व १ उकळी आणावी पुन्हा ५ मिनिटांसाठी झाकून चिकन शिजवावे.
- मिक्सरला लावलेले वाटण, १ ग्लास पाणी व मीठ घालून चिकनला उकळी काढावी.
- रस घालून ढवळत उकळी आणावी व वरुन कोथिंबीर घालावी.
- गरमागरम सागुती आपली तयार झाली वड्या सोबत आपण सर्व्ह करावे.
Recipe Notes
- वड्यासाठी जी पीठ वापरणार ती चाळून घ्यावी.
- पीठ मळताना गरम पाणीच वापरावे.
- कोळसा नसेल तर कच्चा कांदा पिठात मध्ये ठेवावा.