Print Recipe
झटपट तयार होणारा टेस्टी नीर डोसा
Instructions
- तांदूळ चाळून, वेचून घ्यावे व २-३ पाण्याने स्वच्छ धुवून ४ तासांसाठी भिजत ठेवावे.
- ४ तासानंतर तांदळातील पाणी काढून तांदूळ व खोबरे मिक्सरला वाटून घ्यावे.
- या मिश्रणाला थोडे पाणी व मीठ घालून पातळ मिश्रण तयार करावे.
- भिडचा किंवा नॉनस्टीकचा तवा गरम करावा व त्याला तेल लावावे.
- बॅटर ढवळून घ्यावे.
- भिडाचा तवा असलेला गॅस मोठा करून एक छोट्या पेल्याने हे मिश्रण तव्यावर घालावे म्हणजे छान जाळी पडते.
- आता गॅस बारीक करावा व एक बाजूने डोसा भाजल्यावर परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावा.
- जाळीच्या प्लेटवर काढावा म्हणजे त्यातील वाफ निघते.
- नीर डोसा दुमडून डब्यात ठेवावा.
- अशाप्रकारे सर्व निरडोसे तयार करावेत.
- चटणी, आमटी कशासोबतही खाता येतात.