Print Recipe
गाड्या वरच्या पावभाजी ची चव आणि त्याचे अचूक प्रमाण
Servings |
5 People
|
Ingredients
- 1 कप फ्लॉवर
- 1 कप हिरवा वाटाणा
- 2 सिमला मिरची बारीक चिरून
- 4-5 बटाटे तुकडे करून
- 4 टोमॅटो
- 1 कांदा बारीक चिरलेला
- 2-3 टीस्पून पावभाजी मसाला
- कोथिंबीर बारीक चिरून
- 1/2 लिंबू
- 2 टीस्पून लालतिखट
- 1/4 टीस्पून हळद
- मीठ
- 1 टीस्पून साखर
- 1 टेबलस्पून तेल
- 1 टेबलस्पून बटर
- 1/4 टीस्पून ऑरेंज रेड कलर
Ingredients
|
|
Instructions
- कुकरच्या एक डब्यात भिजवलेला हिरवा वाटाणा, टोमॅटो, हळद व १/२ कप पाणी घालणे.
- दुसऱ्या डब्यात बटाटे, फ्लॉवर, सिमला मिरची व १/२ कप पाणी घालणे.
- दोन्ही डबे कुकरला ठेवून ४ शिट्टया काढणे.
- परातीत हे मिश्रण घेऊन स्मॅशरने बारीक करून घेणे.
- गॅसवर कढई गरम करणे. त्यात बटर गरम करणे. कांदा घालून गुलाबीसर परतणे.
- फोडणीत साखर घालून परतणे.
- लालतिखट, पावभाजी मसाला घालून परतणे.
- स्मॅश केलेले मिश्रण घालून चांगले एकजीव करणे. कलर घालणे.
- चवीनुसार मीठ घालणे व चांगले मिक्स करून १ उकळी आणावी.
- लिंबाचा रस, बटर, कोथिंबीर घालून पुन्हा १० मिनिटांसाठी मंद गॅसवर शिजवणे.
- पाव मधोमध कापून घेणे. तव्यावर बटर गरम करून पाव छान भाजून घेणे.
- प्लेटमध्ये भाजलेले पाव, भाजी त्यावर बटर, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
Recipe Notes
- भाज्या चांगल्या २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवाव्यात.
- आवडत असल्यास आल लसूण पेस्ट वापरावी.