Print Recipe
पारंपरिक घडीची चपाती
Ingredients
|
|
Instructions
- गव्हाचे पीठ चाळून घ्यावे.
- पिठात सायीसहित दूध घालून चांगले एकजीव करावे.
- मीठ व पाणी घालून पीठ व्यवस्थित मऊसूत मळून घ्यावे.
- थोड तेल लाऊन १५ ते २० मिनिटे पीठ झाकून ठेवावे.
- हाताला थोडे तेल लाऊन पीठ पुन्हा मळून घ्यावे.
- छोटे छोटे गोळे करून घेणे.
- गोळ्याच्या छोट्या लाट्या करून घ्याव्यात.
- लाटीला तेल लावून चार पदरी घडी घालावी.
- अशाप्रकारे सर्व लाट्या तयार करून घ्याव्यात म्हणजे चपाती करायला सोपे जाते.
- १-१ लाटी पिठात बुडवून गोलाकार पातळ चपाती लाटून घ्यावी.
- तवा गरम करून घ्यावा चपाती लाटेपर्यंत.
- गरम तव्यावर गॅस मंद करून चपाती घालावी त्याला थोडेसे भाजल्यावर चपाती पलटावी व गॅस मोठा करावा. तूप घालावे व हलक्या हाताने पोळीला उलथण्याने दाबत चपाती दोन्ही साईडने भाजून घ्यावी.
- जाळीदार प्लेटमध्ये किंवा कपड्यावर काढावी म्हणजे वाफ निघते. अशा सगळ्या चपत्या बनवून घ्याव्यात.
- मऊसूत पोळ्या गरमागरम खायला द्याव्यात.