Print Recipe
वर्षभर चिंच कशी साठवून ठेवाल
Ingredients
|
|
Instructions
- चिंचेची साल व आतील सर्व धागे काढून चिंच साफ करून घेणे.
- ही चिंच १ दिवस कडक उन्हात वाळवणे.
- विळीवर किंवा खलबत्यावर चिंचेतील सर्व चिंचोके काढून चिंच पूर्ण साफ करून घेणे.
- या चिंचेला आता मीठ लावून एका टोपलीत १ रात्र झाकून ठेवावे.
- दुसऱ्या दिवशी पाट्यावर अथवा खलबत्यात चिंच कुटून त्याचे गोळे बनवणे.
- जास्त मोठे गोळे बनवू नये.
- आता सर्व तयार गोळे पुन्हा २ दिवसांसाठी उन्हात चांगले वाळवून घेणे.
- चिनीमातीच्या अथवा काचेच्या बरणीत हे गोळे भरून ठेवावे.
- गोळे काढताना ओला हात लावू नये.
Recipe Notes
चिंच साफ करताना एकही चिंचोका रहाता नये याची खात्री करावी. नाहीतर चिंचेला कीड लागते. जास्त ओली चिंच असेल तर २ दिवस उन्हात वाळवावी.