चुलीवरची गावरान कोंबडी वडा

Print Recipe
चुलीवरची गावरान कोंबडी वडा
Servings
Ingredients
मालवणी वडे साहित्य
चिकन सागोती साहित्य
गरम मसाला
फोडणीसाठी -
Servings
Ingredients
मालवणी वडे साहित्य
चिकन सागोती साहित्य
गरम मसाला
फोडणीसाठी -
Instructions
मालवणी वडे कृती
 1. चणाडाळ व उडीद डाळ २ पाण्याने स्वच्छ धुवून २ तासांसाठी गरम पाण्यात भिजत ठेवावी.
 2. धणे, मेथी, बडीशेप, मिरी कोरडेच भाजून घ्यावे व त्यांची मिक्सरवर बारीक पूड करावी.
 3. याच पुडमध्ये भिजवलेली उडीद डाळ व चणाडाळ देखील बारीक वाटून घ्यावी.
 4. तांदळाचे, ज्वारीचे व गव्हाचे पीठ एकत्र करावे त्यात हळद, मीठ घालून मिक्स करावे.
 5. पातेलीत पाणी गरम करून घ्यावे.
 6. मिक्स केलेल्या पिठात मिक्सरला लावलेली पेस्ट घालणे व गरम पाणी घालून पीठ मळून घेणे.
 7. पोळीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्यावे.
 8. मळलेल्या पिठाच्या मधोमध एक होल करावा त्यात गरम कोळसा घालून पीठ झाकून ठेवावे.
 9. २ तासांसाठी पीठ झाकून ठेवावे म्हणजे ते चांगले फुलते व वडे छान होतात.
 10. २ तासानंतर पिठातील कोळसा व त्याच्या बाजूचे थोडे पीठ काढून टाकावे.
 11. थोडेसे तेल घालून पीठ पुन्हा चांगले मळून घ्यावे व त्याचे गोळे करावे. उरलेले पीठ झाकून ठेवावे.
 12. केळीच्या पानाला किंवा प्लॅस्टिकला तेल लावून त्यावर १-१ गोळा ठेवून हाताने थोडेसे जाडसर वडे थापुन घ्यावेत.
 13. कढईत तेल चांगले गरम करावे व नंतर गॅस मध्यम करावा.
 14. वडे तेलात सोडावेत व झाऱ्याने हलकेच दाबावेत म्हणजे वडे मस्त फुगतात.
 15. वडा तेलात फुगला की परतून दुसऱ्या बाजूने देखील वडा भाजून घ्यावा. अशाप्रकारे सर्व वडे छान भाजून घ्यावेत.
चिकन सागोती कृती
 1. चिकन साफ करून स्वच्छ धुवून घ्यावे.
 2. आलं, लसूण व कोथिंबीर यांची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी.
 3. चिकनला हळद, मीठ, मालवणी मसाला (२ चमचे) व आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट लावून १/२ ते १ तास मॅरीनेट करणे.
 4. तव्यावर उभा चिरलेला कांदा थोडा परतून घेणे नंतर त्यात तेल घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेणे.
 5. यांत आता अर्धे ओले खोबरे घालणे. अर्धे ओले खोबरे रस करण्यासाठी बाजूला ठेवणे.
 6. ओले खोबरे थोडे परतले की सुके खोबरे घालणे व परतून घेणे.
 7. सर्व ब्राऊन होईपर्यंत परतून घेणे.
 8. भाजल्यानंतर खोबरे बाजूला करून मधे सर्व गरम मसाला घालावा व भाजून घ्यावा. सर्व चांगले मिक्स करावे व थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करावे.
 9. पातेलीत तेल तापल्यावर तमालपत्र व कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
 10. यांवर आता मॅरीनेट केलेले चिकन चांगले परतून घ्यावे. पातेलीवर झाकण ठेवावे यात पाणी ठेवावे व चिकनला १ वाफ आणावी.
 11. गरम झालेले झाकणावरील पाणी आत घालावे व चिकन शिजू द्यावे.
 12. १० मिनिटांसाठी झाकून चिकन शिजवावे.
 13. आता २ चमचे मालवणी मसाला घालावा व १ उकळी आणावी पुन्हा ५ मिनिटांसाठी झाकून चिकन शिजवावे.
 14. मिक्सरला लावलेले वाटण, १ ग्लास पाणी व मीठ घालून चिकनला उकळी काढावी.
 15. रस घालून ढवळत उकळी आणावी व वरुन कोथिंबीर घालावी.
 16. गरमागरम सागुती आपली तयार झाली वड्या सोबत आपण सर्व्ह करावे.
Recipe Notes
 1. वड्यासाठी जी पीठ वापरणार ती चाळून घ्यावी.
 2. पीठ मळताना गरम पाणीच वापरावे.
 3. कोळसा नसेल तर कच्चा कांदा पिठात मध्ये ठेवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *