Print Recipe
मालवणी मच्छी फ्राय मसाला
Servings |
|
Ingredients
- 750 ग्रॅम बेडगी मिरची
- 250 ग्रॅम गुंटूर मिरची
- 250 ग्रॅम धणे
- 50 ग्रॅम हळकुंड
- 1 चमचा तेल
Ingredients
|
|
Instructions
- मार्केटमधून चांगल्या प्रतिच्या मिरच्या आणाव्यात.
- मिरच्या १ दिवस उन्हात चांगल्या वाळवाव्यात, मिरच्या छान कडक होतील.
- सर्व मिरच्यांचे देठ काढून तेलाचा हात लावावा.
- मिरच्या पुन्हा २ दिवस उन्हात चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत वाळवाव्यात.
- तिसऱ्या दिवशी हळकुंड व धणे देखील उन्हात वाळवावेत.
- मिरच्या, धणे, हळकुंड एकत्र करून घ्यावे व त्याच दिवशी मसाला बारीक दळून आणावा.
- तिसऱ्या दिवशी मिरची छान कुरकुरीत झालेली असते त्यामुळे मसाला छान दळला जातो.
- मसाला दळून आणल्यानंतर थोडा वेळ उघडा ठेवावा व थंड झाल्यानंतर काचेच्या किंवा चिनीमातीच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावा व त्यावर हिंगाचे मोठे खडे ठेवावेत.
Recipe Notes
- धणे चालून व वेचून घ्यावेत.
- हळकुंड फोडून घ्यावीत.