Print Recipe
मिक्सरवर बनवा १५ मिनिटात २१० ग्राम खमंग मालवणी मसाला
Servings |
|
Ingredients
- 100 ग्रॅम बेडगी मिरची
- 25 ग्रॅम गुंटूर मिरची
- 25 ग्रॅम धणे
- 12 ग्रॅम मिरी
- 12 ग्रॅम खसखस
- 7 ग्रॅम बडीशेप
- 7 ग्रॅम सुंठ
- 7 ग्रॅम मोहरी
- 2 आणि 1/2 ग्रॅम दालचिनी ग्रॅम
- 2 ग्रॅम तमालपत्र
- 2 आणि 1/2 ग्रॅम लवंग
- 2 आणि 1/2 ग्रॅम जायफळ
- 2 आणि 1/2 ग्रॅम मसाला वेलची
- 2 आणि 1/2 ग्रॅम बदामफुल
- 2 ग्रॅम शहाजिरे
- 1 ग्रॅम खडा हिंग
- 7 ग्रॅम हळद कांडी
- 2 आणि 1/2 ग्रॅम दगडफुल
- 1 ग्रॅम नाकेश्वर
- 2 आणि 1/2 ग्रॅम वेलची
- 2 आणि 1/2 ग्रॅम जिरे
- 2 ग्रॅम जायपत्री
- 2 आणि 1/2 ग्रॅम मेथी
Ingredients
|
|
Instructions
- मिरचीचे देठ काढून मिरची साफ करून घ्यावी व मिरचीला २ दिवस कडक ऊन दाखवावे.
- सर्व गरम मसाले चाळून, निवडून घ्यावेत व त्यांना देखील ऊन दाखवावे.
- गॅसवर तवा गरम करावा त्यात धणे कोरडेच भाजून घ्यावेत.
- धणे काढून १/२ चमचा तेल गरम करावे व त्यांत चक्रीफुल, मिरी, लवंग, हिरवी वेलची, मसाला वेलची, नाकेश्वर सारखे मोठे मसाले पहिले छान परतून घ्यावेत.
- जायपत्री, दालचिनी घालून परतून घेणे.
- बडीशेप, जिरे, शहाजिरे परतून घेणे.
- मोहरी, खसखस परतून घेणे. सर्व मसाले छान भाजून घेणे व गॅस बंद करणे.
- सर्व मसाले प्लेटमध्ये काढून घेणे व पुन्हा १/२ चमचा तेल गरम करणे.
- हिंगाचे तुकडे करून तेलात तळून घ्यावे. त्यांत जायफळ, सुंठ यांचेही तुकडे करून घालावेत. दगडफुल, तमालपत्री देखील घालून चांगले परतून घ्यावे.
- यांवर मेथी घालावी व परतावी हा मसाला देखील प्लेटमध्ये काढावा.
- मिरच्यांचे तुकडे करून मिरच्या तव्यावर भाजून घ्याव्यात. अगदीच कोरड्या वाटल्यास थोडेसे तेल घालावे.
- मिरच्या व सर्व गरम मसाले थंड करावेत. मिक्सरला बारीक करून चाळून घ्यावे. जो जाडसर मसाला राहील तो पुन्हा मिक्सरला बारीक करावा.
- अशाप्रकारे सर्व मसाला बारीक करून काचेच्या घट्ट झाकण्याच्या बरणीत भरून ठेवावा.
- व्हेज - नॉनव्हेज कशासाठीही हा मसाला वापरता येतो.
Recipe Notes
मिरच्या निवडून थोडेसे तेल लावून वाळवल्याने मिरच्या भाजताना पुन्हा तेल घालावे लागत नाही व मसाल्याला कलर देखील छान येतो.
Very nice