बटाटा वडा

Print Recipe
बटाटा वडा
Servings
11
Ingredients
Servings
11
Ingredients
Instructions
  1. आलं, लसूण यांची बारीक पेस्ट करावी. नंतर त्यात मिरच्या घालून थोडया फिरवाव्यात. भरडा तयार करावा.
  2. पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात मोहरी हिंग धणे, कडीपत्ता, आलं, मिरचीचा भरडा हळद घालून थोडे परतावे. म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो. त्यात कोथिंबीर घालावी. फोडणी थंड करून घ्यावी.
  3. बटाटे हातानी चांगले स्मॅष करून घ्यावे.
  4. बटाटयात फोडणी, मीठ घालून चांगले एकजीव करावे.
  5. छोटे चपटे गोळे करून घ्यावेत. हाताला थोडेसे पाणी लावावे म्हणजे हाताला चिकटत नाहीत.
  6. बेसन चाळून घ्यावे. त्यात हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडेसे पाणी घालून पीठ भिजवावे.
  7. कढईत तेल गरम करावे. वरील बटाटयाचा गोळा एक एक करून पीठात बुडवून तेलात तळून घ्यावा.
  8. गुलाबी सर वडे झाले की तेल निथळून वडे बाहेर काढावेत.
  9. खोब-याच्या चटणीसोबत आणि तळलेल्या मिरची सोबत खायला दयावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *