Print Recipe
रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन बनवायची परफेक्ट रेसिपी
Servings |
|
Ingredients
टिक्का बनवण्यासाठी
- ५०० ग्रॅम चिकन
- २ टेबलस्पून आल लसूण पेस्ट
- २ टेबलस्पून लाल मिरची पावडर
- २५० ग्रॅम दही चक्का
- १/२ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून चाट मसाला
- १/२ लिंबाचा रस
- १ चमचा कसूरी मेथी
- मीठ
गरम मसाले
- २ तुकडे दालचिनी
- २ तमालपत्र
- ८ मिरी
- ३ हिरवी वेलची
- १ मोठी वेलची
- ८ लवंग
- १/२ जायपत्री
Ingredients
टिक्का बनवण्यासाठी
गरम मसाले
|
|
Instructions
टिक्का
- चिकनला चांगल्या चिरा मारून घ्याव्यात म्हणजे मसाला चांगला आतपर्यंत जातो. एका भांड्यात दही, आल लसूण पेस्ट, काश्मिरी मिरची पावडर, हळद, चाट मसाला, मीठ, कसूरी मेथी, लिंबाचा रस व तेल हे सर्व चांगल मिक्स करून घ्यावे. चांगल फेटून चिकनला व्यवस्थित आतपर्यंत लाऊन घ्यावे व १ तास मॅरीनेट करणे. (फ्रीजमध्ये ठेवणे) पॅनमध्ये तेल व बटर घालून त्यावर हे चिकन झाकून ठेवणे एका बाजूने शिजल्यावर परतून दुसऱ्या बाजूने शिजवून घेणे. पूर्ण थंड करून त्याचे छोटे तुकडे करून घेणे.
ग्रेव्ही
- दुसऱ्या पॅनमध्ये तेल व बटर गरम करून त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबीसर परतून घ्यावा. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो चांगला परतून घ्यावा. काजू, आल लसूण, गरम मसाले, साखर, व्हिनीगर, मिरची पूड हे सर्व चांगल मिक्स करून घ्यावे नंतर १ ग्लास पाणी घालून २० मिनिटांसाठी मंद गॅसवर सर्व शिजवून घ्यावे. थोडेसे थंड झाल्यावर मिक्सरला बारीक पेस्ट करून गाळून घ्यावे.
- पॅनमध्ये बटर गरम करून त्यात काश्मिरी मिरची पावडर घालून परतणे. त्यावर वरील ग्रेव्ही घालणे व मिक्स करणे. कसूरीमेथी, क्रीम/साय , मीठ घालून १० ते १५ मिनिटांसाठी मंद गॅसवर ग्रेव्ही शिजवणे आता यात टिककयाचे पीस घालून चांगले मिक्स करणे व पुन्हा ५ मिनिटांसाठी ग्रेव्ही उकळून घ्यावी. कसूरीमेथी व क्रीमने सजावट करावी.