Print Recipe
पौष्टीक आणि चविष्ट डाळ पालक बनवायची अगदी सोपी रेसिपी.
Instructions
- पालक स्वच्छ धुवून घ्यावा. हळद व मिठाच्या पाण्यात पालकाची पाने निवडून १/२ तास भिजत ठेवावीत.
- डाळी दोन्ही एकत्र करून २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून १/२ तास भिजत ठेवावी.
- शेंगदाणा देखील धुवून पाण्यात भिजत ठेवावे.
- पाणी निथळून पालक बारीक चिरून घ्यावा.
- कुकरमध्ये डाळी घालाव्यात पाणी निथळून, त्यातच शेंगदाणे, बारीक चिरलेला पालक, टोमॅटो, हळद, पाणी घालून ३ शिट्टया काढून शिजवून घेणे.
- कढईत तेल गरम करणे.
- शिजलेले डाळ पालकाचे मिश्रण रवीने चांगले घोटून घ्यावे.
- तेलात लसूण, जिरे परतून घ्यावे. घोटलेले मिश्रण, कोल्हापुरी मसाला, मीठ, गूळ, १ कप पाणी घालून चांगले एकजीव करावे.
- मंद गॅसवर १० मिनिटे डाळ उकळत ठेवावी.
- जास्त पातळ करू नये.