पालक पराठा

Print Recipe
पालक आवडत नाही असे म्हणणारे पण अगदी आवडीने खातील अशी चविष्ट रेसिपी.
Servings
3 People
Ingredients
Servings
3 People
Ingredients
Instructions
  1. पालक निवडून २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून, हळद व मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावा नंतर सर्व पाणी निथळून घ्यावे.
  2. कढईत पाणी गरम करावे. त्यात पालकाची पाने घालून १ उकळी काढावी.
  3. दुसऱ्या थंड पाण्यात ही पाने काढावीत. असे केल्याने पालकाचा रंग छान हिरवागार राहतो.
  4. मिक्सरच्या भांड्यात आल, लसूण, हिरवी मिरची, जिरेपूड, साखर, पालकाची पाने पाणी निथळून घालावीत. यांची पेस्ट करून घ्यावी.
  5. मिक्सरला पेस्ट करताना पाणी जराही वापरू नये.
  6. पेस्ट प्लेटमध्ये काढावी. त्यात लिंबुरस, मीठ, गव्हाचे पीठ, तेल घालून चांगले मळून घ्यावे.
  7. पीठ १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
  8. घडीच्या पोळी प्रमाणे करून पराठे लटवेत व भाजून घ्यावेत.
  9. दही, सॉस सोबत सर्व्ह करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *