डोनट्‌स

Print Recipe
बेकरी सारखे डोनट्स घरी बनवून मुलांना खुश करा
Servings
6 Doughnuts
Servings
6 Doughnuts
Instructions
  1. एका प्लेटमध्ये मैदा घ्यावा. त्यामध्ये होल करून यीस्ट, मीठ, साखर मिक्स करावे. नंतर सर्व पीठ एकत्र करावे.
  2. बटर घालून चांगले एकजीव करावे.
  3. थोडे थोडे दूध घालत पीठ चांगले मळून घ्यावे. वरुण तेल लावून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
  4. पुन्हा छान मळून घ्यावे व पोळपाटावर थोडासा मैदा घालून पिठाचे गोळे करून जाडसर पोळी लटवी.
  5. डोनट्स कटरने आकार द्यावा.
  6. १ तास हे डोनट्स झाकून ठेवावे. वरुण थोडेसे तेल किंवा बटर लावावे.
  7. व नंतर ते गरम तेलात तळून घ्यावे.
  8. प्लेटमध्ये काढल्यावर लगेचच त्यावर पिठीसाखर टाकावी. गरम असल्याने त्याला पिठीसाखर छान चिकटते.
  9. दोन्ही चॉकलेट वेगवेगळे वितळवून घ्यावे.
  10. पिठी साखर लावलेली बाजू चॉकलेटमध्ये बुडवावी नंतर टॉपिंग्ज मध्ये बुडवून डोनट्स थंड करायला ठेवावेत.
  11. आवडीप्रमाणे टॉपिंग्ज वापरावेत.
Recipe Notes

१) चॉकलेट बार मेल्ट करून त्यात डोनटची प्लेन बाजू अलगद बुडवून घ्यावी. लगेचच टॉपिंगमध्ये बुडवावे. टॉपिंग सुकू द्यावे.
२) डोनट चॉकलेटमध्ये बुडवून त्यावर गाळण्याने पिठीसाखर घालावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *