प्रसादाचा शिरा

Print Recipe
मऊसुत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत
Servings
5 people
Ingredients
Servings
5 people
Ingredients
Instructions
  1. प्रथम गॅसवर कढईत तूप गरम करावे.
  2. रवा मंद गॅसवर गुलाबी रंग येईपर्यंत बाजून घ्यावा. आता त्यात केळ्याचे बारीक काप करून चांगले परतून घ्यावे.
  3. रवा भाजत असतानाच दुसऱ्या गॅसवर दूध गरम करत ठेवावे.
  4. रवा चांगला भाजल्यावर त्यात गरम केलेले दूध घालावे व लगेच चांगले एकजीव करून घ्यावे, गुठल्या होऊ देऊ नये.
  5. ५ मिनिटानंतर झाकून ठेवलेला रवा चांगला फुलेल. आता त्यात साखर, वेलचीपूड, काजू, बदाम व बेदाणे घालून व्यवस्थित मिक्स करावे.
  6. मंद गॅसवर पुन्हा वाफेवर थोडा शिजवून घ्यावा व वरुण तुळशीपत्र घालावे.
Recipe Notes
  1. रवा चांगला भाजला गेला नाही तर शिरा चिकट होतो.
  2. दूध, साखर एकत्र घालू नये त्यामुळे रवा शिजत नाही.
  3. केळ जास्त घालू नये त्यामुळे शिरा आंबट होण्याची शक्यता असते.
  4. प्रसादचा शिरा हा नेहमी सव्वा किलोच्या प्रमाणात केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *