Print Recipe
पालक आवडत नाही असे म्हणणारे पण अगदी आवडीने खातील अशी चविष्ट रेसिपी.
Servings |
3 People
|
Ingredients
- 1 मोठी जुडी पालक
- 1 मोठा बाऊल गव्हाचे पीठ
- 1 इंच आल
- 8-10 लसूण
- 5 हिरव्या मिरच्या
- 1/2 लिंबू
- 1/2 टीस्पून साखर
- 1/2 टीस्पून जिरेपूड
- मीठ
- तेल
Ingredients
|
|
Instructions
- पालक निवडून २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून, हळद व मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावा नंतर सर्व पाणी निथळून घ्यावे.
- कढईत पाणी गरम करावे. त्यात पालकाची पाने घालून १ उकळी काढावी.
- दुसऱ्या थंड पाण्यात ही पाने काढावीत. असे केल्याने पालकाचा रंग छान हिरवागार राहतो.
- मिक्सरच्या भांड्यात आल, लसूण, हिरवी मिरची, जिरेपूड, साखर, पालकाची पाने पाणी निथळून घालावीत. यांची पेस्ट करून घ्यावी.
- मिक्सरला पेस्ट करताना पाणी जराही वापरू नये.
- पेस्ट प्लेटमध्ये काढावी. त्यात लिंबुरस, मीठ, गव्हाचे पीठ, तेल घालून चांगले मळून घ्यावे.
- पीठ १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
- घडीच्या पोळी प्रमाणे करून पराठे लटवेत व भाजून घ्यावेत.
- दही, सॉस सोबत सर्व्ह करावे.