स्पेशल मालवणी मसाला

Print Recipe
मालवणी जेवणाचा आस्वाद हवाय तर बनवा हा मसाला.
Servings
Ingredients
मिरची
गरम मसाला
Servings
Ingredients
मिरची
गरम मसाला
Instructions
  1. मिरच्यांना १ ऊन देऊन त्यांचे देठ काढून घ्यावेत.
  2. देठ काढलेल्या मिरच्यांना थोडेसे तेल लाऊन २ उन्हात मिरच्या चांगल्या वाळवाव्यात.
  3. गरम मसाले स्वच्छ वेचून, चालून तेही वेगवेगळे १ दिवस उन्हात वाळवावेत.
  4. कढईत थोडेसे तेल घालून मंद गॅसवर मिरच्या भाजून घ्याव्यात. साल काळी करू नये.
  5. धणे, जिरे, शहाजिरे व बडीशेप कोरडेच भाजून घ्यावे.
  6. कढईत तेल गरम करावे त्यात मिरी भाजावी.
  7. तेलात हिंग, हळकुंड, मसाला वेलची, हिरवी वेलची, चक्रीफुल, नाकेश्वर, लवंग, दालचिनी सर्व तळून घ्यावे. पूर्ण तेल निथळून घ्यावे.
  8. उरलेले मसाले थोडेसे तेल टाकून भाजून घेणे.
  9. सर्व मसाले व मिरच्या थंड झाल्यावर एकत्र करून गिरणीतून दळून आणावी.
  10. डंकवर मसाला कुटायचा असल्यास मीठ थोडेसे गरम करून मसाल्याबरोबर द्यावे.
  11. काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत तो मसाला भरावा. वरुण हिंगचे मोठे खडे ठेवाव. छोट्या छोट्या प्लॅस्टिक पिशव्यामध्ये भरून मेणबत्तीने सील केले तरी चालते.
  12. हा मसाला वर्षभर टिकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *