मालवणी बांगडा करी

Print Recipe
अस्सल मालवणी बांगड्यांची आमटी ची चव तर पहा.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. बांगडे स्वच्छ करून त्याचे तुकडे करावेत न धुवून त्याला हळद व मीठ लावून १/२ तास ठेवावे.
  2. एक बाऊलमध्ये बेडगी मिरची, धणे, मिरी, चिंच व ६ त्रिफळ पाण्यात भिजत ठेवावे १ तासांसाठी.
  3. १/२ कांदा व ओल खोबर यांची मिक्सरला एकत्रित पेस्ट करावी.
  4. भिजवलेल्या मिरची व मासाल्यानंची एकत्र पेस्ट करावी.
  5. एक पातेलीत तेल गरम करावे त्यात कांदा परतून घ्यावा. चेचलेले त्रिफळ व एक हिरवी मिरची कापून घालावी.
  6. माशाचे तुकडे घालून मंद गॅसवर परतावे.
  7. लाल वाटण घालून परतावे. थोडे पाणी घालावे व १ उकळी आणावी.
  8. खोबऱ्याचे वाटण, पाणी, मीठ, हळदीचे पान घालून चांगले हलवून घ्यावे.
  9. आमटीला उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
  10. गरमागरम भातासोबत आमटी सर्व्ह करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *