Print Recipe
भोपळ्याचे पौष्टिक घारगे पारंपरिक पद्धतीने बनवने झाले आता सोपे.
Servings |
|
Ingredients
- 1 कप लाल भोपळ्याचा कीस
- 1 कप गूळ
- 2-3 कप गव्हाचे पीठ
- 1/2 टीस्पून मीठ
- 1 टीस्पून तूप
- 1/2 टीस्पून वेलचीपूड
- 1/2 टीस्पून हळद
- 1 टीस्पून तीळ
- 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ
Ingredients
|
|
Instructions
- लाल भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घ्यावा.
- गुळही किसून घ्यावे.
- एका पॅनमध्ये तूप गरम करणे त्यात भोपळ्याचा कीस थोडासा परतून घ्यावा. २ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी.
- आता वरील मिश्रणात गूळ घालून चांगले शिजवून घ्यावे. त्यातच मीठ व वेलचीपूड घालावे.
- गॅस बंद करून हळद व तीळ घालून एकजीव करावे. मिश्रण थंड करून घ्यावे.
- थंड झालेल्या मिश्रणात तांदळाचे पीठ व गव्हाचे पीठ (गव्हाचे पीठ मिश्रणात बसेल एवढे वापरायचे आहे २ किंवा ३ वाटी लागू शकते) घालून मळून घ्यावे. १/२ तास पीठ झाकून ठेवणे.
- अर्ध्या तासानंतर पीठ पुन्हा चांगले मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे करावेत.
- पोळपाटावर प्लॅस्टिक पेपर ठेवावा त्याला तेल लावून हाताने वडे थापावेत. थोडे जाडसर ठेवावेत.
- गोळे पुरीप्रमाणे लाटूनही घेता येतात.
- लाटताना पीठ लावू नये.
- गरम तेलात मध्यम गॅसवर वडे तळावेत. दोन्ही बाजूंनी रंग थोडा बदलेपर्यंत तळावेत.
- सर्व घाऱ्या अशाप्रकारे तळून घ्याव्यात.
- या घाऱ्या ८ दिवस टिकतात.