Print Recipe
27 प्रकारचे मसाल्या सोबत कांदा व मीठ वापरून केलेला अस्सल मसाला
Servings |
1 Kg
|
Ingredients
- 100 ग्रॅम बेडगी मिरची
- 50 ग्रॅम लवंगी मिरची
- 250 ग्रॅम संकेष्वरी मिरची
- गरम मसाले
- 100 ग्रॅम धणे
- 50 ग्रॅम जिरे
- 5 ग्रॅम मिरी
- 5 ग्रॅम शहाजीरे
- 2 ग्रॅम लवंग
- 10 ग्रॅम खसखस
- 2 ग्रॅम मसाला वेलची
- 2 ग्रॅम हिरवी वेलची
- 5 ग्रॅम बडीषेप
- 2 ग्रॅम जायपत्री
- 1/2 ग्रॅम जायफळ
- 2-3 ग्रॅम मेथी
- 10 ग्रॅम मोहरी
- 2 ग्रॅम दगडफूल
- 1 टेबल स्पून हिंग
- 5 ग्रॅम हळदपूड / हळकूंड
- 2 ग्रॅम चक्रीफूल
- 10 ग्रॅम तमालपत्री
- 2 ग्रॅम त्रिफळ
- 50 ग्रॅम तीळ
- 150 ग्रॅम सुके खोबरे
- ½-1 कप शेगदाणे तेल
- 25 ग्रॅम आले
- 1 कप कोथींबीर
- 50 ग्रॅम लसूण
- 250 ग्रॅम कांदा
- 100 ग्रॅम मीठ
Ingredients
|
|
Instructions
- मिरच्या एक दिवस उन्हात वाळवून देठ काढावेत. नंतर पून्हा 2 दिवस उन्हात वाळवाव्यात
- आलं, कोंथिेबीर स्वच्छ धुवून तुकडे करून उन्हात वाळवावे. लसूणही सोलून उन्हात ठेवावे.
- कांदा बारीक चिरून उन्हात वाळवावे.
- खोब-याचे पातळ तुकडे करून उन्हात वाळवावे.
- सर्व गरम मसाले चाळून, स्वच्छ वेचून उन्हात एक दिवस वाळवावे.
- कढईत थोडे तेल गरम करून त्यात कांदा परतून मंद गॅसवर कांदा षिजत ठेवावा.
- कांदा गुलाबीसर झाला की गॅस बंद करावा व कांदा थंड करावा.
- दुस-या कढईत धणे,जीरे,तीळ, बडीषेप,षहाजीरे,मोहरी,खसखस सर्व वेगवेगळे कोरडे भाजून घ्यावे.
- आता कढईत थोडे तेल गरम करावे. त्यात खोबरे तळून घ्यावे.
- चक्रीफूल, मसाला वेलची, हिरवी वेलची, मिरी, त्रिफळ,मेथी,दालचिनी,हळकूंड, जायफळ,जायपत्री,दगडफूल,लवंग,नागकेषर,तमालपत्री,हे सर्व क्रमाने वरील उरलेल्या तेलात तळून घ्यावे.
- गरम असतानाच हिंगपूड मसाल्यावर घालावी.
- आलं,लसूण, कोथिबीर पाणी न टाकता कोरडीच मिक्सरमध्ये परतून घ्यावी.
- सर्व एकत्र मिक्स करून डंक वर मसाला कुटून आणावा.
- चिनीमातीच्या किंवा काचेच्या बरणीत मसाला भरून ठेवावा.