Print Recipe
झणझणीत मिसळ ची चव घरी मिळण्यासाठी ही पद्धत वापरून पहा.
Instructions
- कापलेला कांदा व सुक खोबर एकत्र भाजून घेणे.
- मटकी, हरभरे, शेंगदाणे २ पाण्याने स्वच्छ धुवून दुसरे पाणी घालून ८ तास भिजवणे नंतर चाळणीवर निथळून मोड काढणे.
- कुकरमध्ये मोड आलेल धान्य, बटाटा, हळद, १ टीस्पून मीठ व १ कप पाणी घालून १ शिट्टी काढणे. नंतर शिजलेल्या धान्यातील सर्व पाणी काढून घेणे.
- सुक खोबर, तीळ, कांदा, लसूण, आल यांची मिक्सरला पेस्ट करून घेणे.
- फोडणीसाठी पातेलीत तेल गरम करणे त्यात जिरे, कढीपत्ता, साखर यांची फोडणी करणे.
- यांत आपण २ टोमॅटोची पेस्ट, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. लालतिखट परतून घ्यावे.
- बारीक केलेले वाटण घालून चांगले परतावे.
- कोल्हापुरी मसाला, मीठ घालून चांगले एकजीव करावे.
- जसा कट हवा असेल त्याप्रमाणात गरम पाणी मिक्स करावे.
- मटकी शिजवलेले पाणी घालणे.
- मंद गॅसवर झाकण अर्धवट ठेवून १० मिनिटे कट शिजवून घेणे.
- कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावे.
Recipe Notes
- सर्व्ह असे करावे : सर्व्हिंग बाउलमध्ये १ टेबलस्पून मटकी, बटाटा १ टी स्पून, १ वाटी कट घालावा. त्यावर फरसाण, बारीक चिरलेला कांदा, शेव व कोथिंबीर घालावी.