कोल्हापुरी मिसळ

Print Recipe
झणझणीत मिसळ ची चव घरी मिळण्यासाठी ही पद्धत वापरून पहा.
Servings
6 People
Ingredients
Servings
6 People
Ingredients
Instructions
 1. कापलेला कांदा व सुक खोबर एकत्र भाजून घेणे.
 2. मटकी, हरभरे, शेंगदाणे २ पाण्याने स्वच्छ धुवून दुसरे पाणी घालून ८ तास भिजवणे नंतर चाळणीवर निथळून मोड काढणे.
 3. कुकरमध्ये मोड आलेल धान्य, बटाटा, हळद, १ टीस्पून मीठ व १ कप पाणी घालून १ शिट्टी काढणे. नंतर शिजलेल्या धान्यातील सर्व पाणी काढून घेणे.
 4. सुक खोबर, तीळ, कांदा, लसूण, आल यांची मिक्सरला पेस्ट करून घेणे.
 5. फोडणीसाठी पातेलीत तेल गरम करणे त्यात जिरे, कढीपत्ता, साखर यांची फोडणी करणे.
 6. यांत आपण २ टोमॅटोची पेस्ट, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. लालतिखट परतून घ्यावे.
 7. बारीक केलेले वाटण घालून चांगले परतावे.
 8. कोल्हापुरी मसाला, मीठ घालून चांगले एकजीव करावे.
 9. जसा कट हवा असेल त्याप्रमाणात गरम पाणी मिक्स करावे.
 10. मटकी शिजवलेले पाणी घालणे.
 11. मंद गॅसवर झाकण अर्धवट ठेवून १० मिनिटे कट शिजवून घेणे.
 12. कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावे.
Recipe Notes
 1. सर्व्ह असे करावे : सर्व्हिंग बाउलमध्ये १ टेबलस्पून मटकी, बटाटा १ टी स्पून, १ वाटी कट घालावा. त्यावर फरसाण, बारीक चिरलेला कांदा, शेव व कोथिंबीर घालावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *