Print Recipe
मार्केट सारखा फिश करी मसाला बनवा या योग्य प्रमाणात
Servings |
|
Ingredients
- 500 ग्रॅम बेडगी मिरची
- 125 ग्रॅम गुंटूर मिरची
- 50 ग्रॅम लवंगी मिरची
- 100 ग्रॅम धणे
- 10 ग्रॅम जिरे
- 50 ग्रॅम बडीशेप
- 20 ग्रॅम मिरी
- 50 ग्रॅम हळकुंड
- 10 ग्रॅम त्रिफळ
- 5 ग्रॅम हिंग
- 50 ग्रॅम मीठ (जाडं मीठ)
Ingredients
|
|
Instructions
- मिरच्या १ दिवस उन्हात कडक वाळवाव्यात.
- मिरच्यांचे देठ काढून मिरच्या निवडून घ्याव्यात.
- मिरच्यांना तेलाचा हात लावून मिरच्या पुन्हा २ दिवस उन्हात चांगल्या सुकवून घ्याव्यात.
- गरम मसाला देखील चाळून व वेचून घ्याव्या.
- तिसऱ्या दिवशी मिरची व सर्व गरम मसाला उन्हात चांगल सुकवून घ्यावे.
- त्याच दिवशी दुपारी मिरची व सर्व मसाले एकत्र करून बारीक दळून आणावे, म्हणजे मिरची चांगली बारीक होते.