Print Recipe
तवा वापरून बनवा ढाबा स्टाईल बटर नान
Servings |
|
Ingredients
- 4 टेबलस्पून बटर
- 2 कप मैदा
- 1 कप दूध
- 1/2 टीस्पून मीठ
- 1 टेबलस्पून तेल
- 1/2 टीस्पून बेकिंग सोडा
- 1 टीस्पून साखर
- 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
Ingredients
|
|
Instructions
- मैदा चाळणीने चालून घ्यावा.
- परातीत मैदा घ्यावा त्यात मधे खड्डा करून त्यात सोडा, बेकिंग पावडर, मीठ, तेल घालून चांगले मिक्स करावे.
- थोडे थोडे दूध घालत पीठ मळून घ्यावे.
- हे पीठ आता २० ते २५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे. पिठाला वरुन तेल लावावे म्हणजे पीठ कोरडे पडत नाही.
- पुन्हा पीठ हाताने मळून घ्यावे व पिठाचे गोळे करावे.
- पोळपाटाला थोडे तेल लावावे व त्यावर गोळा ठेवून त्याची पोळी लाटून घ्यावी.
- पोळीला पूर्ण बटर लावून घ्यावे. त्यावर मैदा भूरभुरून घ्यावा. नंतर त्याची हलक्या हाताने पंखाप्रमाणे घडी करावी व थोडीशी खेचून घ्यावी व गोल करावे.
- आता हा तयार गोळा पुन्हा लाटावा (जास्त पातळ लाटू नये).
- नानच्या एका बाजूला पाणी लावावे.
- लोखंडी तवा गरम करून घ्यावा. पाणी लावलेली बाजू तव्याला व्यवस्थित चिटकवून घ्यावी.
- नान थोडा भाजला की ती फुगेल.
- गॅस मोठा करावा व त्यावर तवा उलट पकडावा व दुसऱ्या बाजूने देखील नान भाजून घ्यावा.