बटर नान

Print Recipe
तवा वापरून बनवा ढाबा स्टाईल बटर नान
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. मैदा चाळणीने चालून घ्यावा.
  2. परातीत मैदा घ्यावा त्यात मधे खड्डा करून त्यात सोडा, बेकिंग पावडर, मीठ, तेल घालून चांगले मिक्स करावे.
  3. थोडे थोडे दूध घालत पीठ मळून घ्यावे.
  4. हे पीठ आता २० ते २५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे. पिठाला वरुन तेल लावावे म्हणजे पीठ कोरडे पडत नाही.
  5. पुन्हा पीठ हाताने मळून घ्यावे व पिठाचे गोळे करावे.
  6. पोळपाटाला थोडे तेल लावावे व त्यावर गोळा ठेवून त्याची पोळी लाटून घ्यावी.
  7. पोळीला पूर्ण बटर लावून घ्यावे. त्यावर मैदा भूरभुरून घ्यावा. नंतर त्याची हलक्या हाताने पंखाप्रमाणे घडी करावी व थोडीशी खेचून घ्यावी व गोल करावे.
  8. आता हा तयार गोळा पुन्हा लाटावा (जास्त पातळ लाटू नये).
  9. नानच्या एका बाजूला पाणी लावावे.
  10. लोखंडी तवा गरम करून घ्यावा. पाणी लावलेली बाजू तव्याला व्यवस्थित चिटकवून घ्यावी.
  11. नान थोडा भाजला की ती फुगेल.
  12. गॅस मोठा करावा व त्यावर तवा उलट पकडावा व दुसऱ्या बाजूने देखील नान भाजून घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *