चिकन पुलाव

Print Recipe
तांदूळ भाजून बनविलेला खमंग पुलाव.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. तांदूळ २ पाण्याने स्वच्छ धुवून १ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवावा.
  2. चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.
  3. चिकनला मीठ, हळद, लालतिखट, गरम मसाला, पेस्ट, दही कोथिंबीर, पुदिना हे सर्व लावून १ तासासाठी मॅरीनेट करायला ठेवणे.
  4. पॅनमध्ये तूप गरम करून त्यात तांदळातील पाणी पूर्ण निथळून मध्यम गॅसवर तांदूळ परतून घ्यावे व प्लेटमध्ये काढून घ्यावे.
  5. याच पॅनमध्ये तेल गरम करणे. त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
  6. टोमॅटो कांद्यावर चांगला मऊ होईपर्यंत शिजवावा.
  7. चिकन यावर चांगले परतून घ्यावे. झाकण ठेवून ५ मिनिटांसाठी वाफ येऊ द्यावी.
  8. चिकनमध्ये ५ कप गरम पाणी घालावे. हलक्या हाताने मिक्स करून त्यात लिंबाचा रस घालून उकळी काढावी.
  9. तांदूळ घालून मिक्स करावे. प्रथम मध्यम गॅसवर ५ मिनिटे पुलाव शिजवावा.
  10. नंतर गॅस मंद करून पुन्हा पुलाव छान शिजवून घ्यावा. पुलाव छान फुलेल.
  11. कोथिंबीर घालून पुलाव सर्व्ह करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *