Print Recipe
अगदी सोप्या पद्धतीने डाळ भिजवून केलेले चटपटीत दहीवडे.
Instructions
- उडीद डाळ २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून ५ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवावी.
- पाण्यात हिंग, मीठ घालून तयार ठेवावे.
- दहयात मीठ, काळ मीठ, साखर, थोडे पाणी घालून दही फेटून घ्यावे व फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवावे.
- डाळीतील पाणी पूर्ण निथळून थोडी थोडी डाळ घेऊन मिक्सरला बारीक वाटून घ्यावी. त्यात हिरवी मिरची, आल घालून बारीक पेस्ट बनवावी. (गरज वाटल्यास अगदी थोडेसे पाणी वापरावे).
- वाटलेल्या डाळीत चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून चमच्याने अथवा हाताने एक दिशेने पीठ चांगले फेटून घ्यावे. त्यामुळे वडे एकदम हलके होतात.
- कढईत तेल गरम करणे.
- पाण्यात हात ओला करून छोटे छोटे गोळे करून तेलात सोडावेत. दोन्ही बाजूंनी थोडा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
- तळलेले वडे हिंगाच्या पाण्यात घालावेत व ५ मिनिटांसाठी ठेवावेत. तोपर्यंत दुसरे वडे तळून घ्यावेत.
- हाताने हलके दाबून त्यातील पाणी काढावे व वडे प्लेटमध्ये काढावेत.
- सऱ्व्हींग प्लेटमध्ये ४ वडे घ्यावेत त्यावर दही घालावे. जिरेपूड, लालतिखट, चाट मसाला, काळ मीठ, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कोथिंबीर व शेव घालावे.
Recipe Notes
- डाळ वाटताना पाणी जास्त वापरू नये वडे तेलकट होतात.
वडे आपण अगोदर बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो.