दहीवडे

Print Recipe
अगदी सोप्या पद्धतीने डाळ भिजवून केलेले चटपटीत दहीवडे.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
 1. उडीद डाळ २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून ५ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवावी.
 2. पाण्यात हिंग, मीठ घालून तयार ठेवावे.
 3. दहयात मीठ, काळ मीठ, साखर, थोडे पाणी घालून दही फेटून घ्यावे व फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवावे.
 4. डाळीतील पाणी पूर्ण निथळून थोडी थोडी डाळ घेऊन मिक्सरला बारीक वाटून घ्यावी. त्यात हिरवी मिरची, आल घालून बारीक पेस्ट बनवावी. (गरज वाटल्यास अगदी थोडेसे पाणी वापरावे).
 5. वाटलेल्या डाळीत चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून चमच्याने अथवा हाताने एक दिशेने पीठ चांगले फेटून घ्यावे. त्यामुळे वडे एकदम हलके होतात.
 6. कढईत तेल गरम करणे.
 7. पाण्यात हात ओला करून छोटे छोटे गोळे करून तेलात सोडावेत. दोन्ही बाजूंनी थोडा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
 8. तळलेले वडे हिंगाच्या पाण्यात घालावेत व ५ मिनिटांसाठी ठेवावेत. तोपर्यंत दुसरे वडे तळून घ्यावेत.
 9. हाताने हलके दाबून त्यातील पाणी काढावे व वडे प्लेटमध्ये काढावेत.
 10. सऱ्व्हींग प्लेटमध्ये ४ वडे घ्यावेत त्यावर दही घालावे. जिरेपूड, लालतिखट, चाट मसाला, काळ मीठ, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कोथिंबीर व शेव घालावे.
Recipe Notes
 1. डाळ वाटताना पाणी जास्त वापरू नये वडे तेलकट होतात.
  वडे आपण अगोदर बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *