गोभी मंच्युरिअन

Print Recipe
गोभी मन्चुरिअनची ही रेसिपी तुम्हाला इतकी आवडेल की घरात रोजच बनेल.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. १ टीस्पून हळद व मीठ, १ बाऊल पाण्यात मिक्स करावे. त्यात फूल गोभीचे तुकडे करून घालणे १/२ तासांसाठी ठेवणे. फूल गोभीचे मोठे देठ घेऊ नये.
  2. नंतर फूल गोभी चाळणीवर काढून त्याचे पाणी पूर्ण सुकवावे व फूल गोभी बारीक कापून घ्यावा.
  3. त्यात मीठ, मिरीपुड, साखर घालून फूल गोभीला चांगले चोळून घ्यावे. थोडेसे पाणी सुटले की कॉर्नफ्लॉवर व मैदा घालून एकजीव करावे. पाणी वापरू नये.
  4. मिश्रण मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. सर्व मिश्रणाचे गोळे बनवावेत.
  5. कढईत तेल गरम करणे नंतर गॅस मध्यमवर ठेवून सर्व गोळे हलके सोनेरी होईपर्यंत तळावेत.
  6. कढईत तेल गरम करणे त्यात मिरची, लसूण, आल परतून घ्यावे व कांदा पात घालावी.
  7. १ कप पाणी, सॉस, साखर व मीठ घालून उकळी आणावी.
  8. कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करावे व हे मिश्रण वरील सॉसमध्ये घालून उकळावे.
  9. तळलेले मंच्युरिअनचे गोळे त्यात परतून घ्यावे.
  10. कांदापात घालून एकदा परतून घ्यावे व सर्व्ह करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *