Print Recipe
गोभी मन्चुरिअनची ही रेसिपी तुम्हाला इतकी आवडेल की घरात रोजच बनेल.
Servings |
|
Ingredients
- 1 फूल गोभी
- 1 टीस्पून साखर
- मीठ
- 1 टीस्पून काळी मिरीपूड
- 4 हिरवी मिरची तुकडे करून
- 8-10 लसूण पाकळ्या बारीक करून
- 1 and 1/2 इंच आल बारीक करून
- 1 टेबलस्पून सोयासॉस
- 2 टेबलस्पून हॉट अँड स्वीट टोमॅटो चिली सॉस
- 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस
- 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर
- 1 कप कांद्याची पात बारीक चिरून
- 1/4 कप मैदा
- 1 कप कॉर्नफ्लॉवर
Ingredients
|
|
Instructions
- १ टीस्पून हळद व मीठ, १ बाऊल पाण्यात मिक्स करावे. त्यात फूल गोभीचे तुकडे करून घालणे १/२ तासांसाठी ठेवणे. फूल गोभीचे मोठे देठ घेऊ नये.
- नंतर फूल गोभी चाळणीवर काढून त्याचे पाणी पूर्ण सुकवावे व फूल गोभी बारीक कापून घ्यावा.
- त्यात मीठ, मिरीपुड, साखर घालून फूल गोभीला चांगले चोळून घ्यावे. थोडेसे पाणी सुटले की कॉर्नफ्लॉवर व मैदा घालून एकजीव करावे. पाणी वापरू नये.
- मिश्रण मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. सर्व मिश्रणाचे गोळे बनवावेत.
- कढईत तेल गरम करणे नंतर गॅस मध्यमवर ठेवून सर्व गोळे हलके सोनेरी होईपर्यंत तळावेत.
- कढईत तेल गरम करणे त्यात मिरची, लसूण, आल परतून घ्यावे व कांदा पात घालावी.
- १ कप पाणी, सॉस, साखर व मीठ घालून उकळी आणावी.
- कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करावे व हे मिश्रण वरील सॉसमध्ये घालून उकळावे.
- तळलेले मंच्युरिअनचे गोळे त्यात परतून घ्यावे.
- कांदापात घालून एकदा परतून घ्यावे व सर्व्ह करावे.