Print Recipe
अस्सल मालवणी बांगड्यांची आमटी ची चव तर पहा.
Servings |
|
Ingredients
- 2 बांगडे मोठे तुकडे
- 7-8 बेडगी मिरची
- 1 टेबलस्पून चिंच
- 1 टेबलस्पून धणे
- 1/4 टीस्पून हळद
- 12 त्रिफळ
- 1 कप ओल खोबर
- 1 कांदा बारीक चिरून
- 1 हिरवी मिरची
- 1 टेबलस्पून तेल
- मीठ
- 1 हळदीचे पान
- 4-5 काळीमिरी दाणे
Ingredients
|
|
Instructions
- बांगडे स्वच्छ करून त्याचे तुकडे करावेत न धुवून त्याला हळद व मीठ लावून १/२ तास ठेवावे.
- एक बाऊलमध्ये बेडगी मिरची, धणे, मिरी, चिंच व ६ त्रिफळ पाण्यात भिजत ठेवावे १ तासांसाठी.
- १/२ कांदा व ओल खोबर यांची मिक्सरला एकत्रित पेस्ट करावी.
- भिजवलेल्या मिरची व मासाल्यानंची एकत्र पेस्ट करावी.
- एक पातेलीत तेल गरम करावे त्यात कांदा परतून घ्यावा. चेचलेले त्रिफळ व एक हिरवी मिरची कापून घालावी.
- माशाचे तुकडे घालून मंद गॅसवर परतावे.
- लाल वाटण घालून परतावे. थोडे पाणी घालावे व १ उकळी आणावी.
- खोबऱ्याचे वाटण, पाणी, मीठ, हळदीचे पान घालून चांगले हलवून घ्यावे.
- आमटीला उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
- गरमागरम भातासोबत आमटी सर्व्ह करावी.