Print Recipe
मऊसुत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत
Servings |
5 people
|
Ingredients
- १ आणि १/४ वाटी तूप
- १ आणि १/४ वाटी साखर
- २ आणि १/४ वाटी दूध
- १ केळ पिकलेल
- १ टेबलस्पून बेदाणे
- १/२ टीस्पून वेलचीपूड
- १ टेबलस्पून काजू तुकडा
- १ टेबलस्पून बदाम बारीक तुकडे करून
- तुळशीपत्र
Ingredients
|
|
Instructions
- प्रथम गॅसवर कढईत तूप गरम करावे.
- रवा मंद गॅसवर गुलाबी रंग येईपर्यंत बाजून घ्यावा. आता त्यात केळ्याचे बारीक काप करून चांगले परतून घ्यावे.
- रवा भाजत असतानाच दुसऱ्या गॅसवर दूध गरम करत ठेवावे.
- रवा चांगला भाजल्यावर त्यात गरम केलेले दूध घालावे व लगेच चांगले एकजीव करून घ्यावे, गुठल्या होऊ देऊ नये.
- ५ मिनिटानंतर झाकून ठेवलेला रवा चांगला फुलेल. आता त्यात साखर, वेलचीपूड, काजू, बदाम व बेदाणे घालून व्यवस्थित मिक्स करावे.
- मंद गॅसवर पुन्हा वाफेवर थोडा शिजवून घ्यावा व वरुण तुळशीपत्र घालावे.
Recipe Notes
- रवा चांगला भाजला गेला नाही तर शिरा चिकट होतो.
- दूध, साखर एकत्र घालू नये त्यामुळे रवा शिजत नाही.
- केळ जास्त घालू नये त्यामुळे शिरा आंबट होण्याची शक्यता असते.
- प्रसादचा शिरा हा नेहमी सव्वा किलोच्या प्रमाणात केला जातो.