सुरमई फ्राय

Print Recipe
इसवणाची ही चव फक्त सिंधुदुर्ग मध्येच मिळते.
Instructions
  1. सुरमई स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यावे.
  2. सुरमईला हळद व मीठ लाऊन १/२ तास ठेवावे.
  3. मालवणी मच्छी मसाला व चिंचेचा कोळ एकत्र करून पेस्ट बनवावी. ही पेस्ट सुरमईला नीट लावून ठेवावी.
  4. तव्यावर तेल गरम करावे.
  5. तांदळाचे पीठ प्लेटमध्ये घ्यावे.
  6. मॅरीनेट केलेले तुकडे तांदळाच्या पिठात बुडवून तेलात शॅलोफ्राय करावेत.
  7. तेल निथळण्यासाठी तव्याच्या कडेला काढून नंतर टिशू पेपरवर काढावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *