राघवदास लाडू

Print Recipe
राघवदास लाडू
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. रवा वेचून घ्यावा.
  2. कढई गरम करणे त्यात रवा थोडा वेळ कोरडा भाजून घेणे व नंतर त्यात तूप घालून रवा मंद गॅसवर हलका गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावा व प्लेटमध्ये काढावा.
  3. खोबर थोडेसे परतून घ्यावे.
  4. कढईत साखर घालणे व साखर बुडेल एवढे पाणी घालणे व पाक बनवत ठेवणे.
  5. प्लेटमध्ये पाणी घेणे व वरील पाकातील १ थेंब टाकून पाक तयार जल आहे का ते पाहणे. (पाकाच्या थेंबाचा गोळा झाला म्हणजे पाक तयार झाला)
  6. भाजलेला रवा, खोबरे, चारोळी व वेलचीपूड एकत्र करून घ्यावे.
  7. हे मिश्रण वरील तयार पाकात घालणे व व्यवस्थित मिक्स करून २० मिनिटे झाकून ठेवणे.
  8. थोडे गरम दूध घालून मिश्रण एकजीव करणे व लाडू वळून घेणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *