Print Recipe
व्हेज पुलाव
Servings |
4 People
|
Ingredients
- 1 कप बासमती तांदूळ
- 2 & 1/2 कप गरम पाणी
- 1 टेबलस्पून तेल
- 2 टेबलस्पून तूप
- 1 कांदा बारीक चिरलेला
- 1 टोमॅटो बारीक चिरलेला
- 1/4 कप मटार
- 1 बटाटा बारीक कापलेला
- 1/4 कप गाजर बारीक कापलेल
- 1/4 कप फ्लॉवर तुकडे करून
- 1/4 कप सिमला मिरची बारीक चिरलेला
- 1/4 कप फरसबी बारीक चिरलेली
- 2-3 चमचे हिरवी मिरची, आल, लसूण, कोथिंबीर पेस्ट
- 1/4 कप ओल खोबर
- 1/4 कप कोथिंबीर बारीक चिरलेली
- 1/2 लिंबू रस
- 2-3 टीस्पून लालतिखट
- 1 टीस्पून गरम मसाला
- 1/4 चमचा साखर
- मीठ
- फोडणी - हिंग, मोहरी, कडीपत्ता, जिरे
Ingredients
|
|
Instructions
- सर्व भाज्या २ पाण्याने स्वच्छ धुवून चिरून घ्याव्यात.
- तांदूळ २ पाण्याने स्वच्छ धुवून १/२ तास पाण्यात भिजत ठेवावे.
- पॅनमध्ये तूप गरम करावे.
- तांदळातील पाणी पूर्ण निथळून तुपावर थोडे भाजून घ्यावेत व नंतर प्लेटमध्ये काढून घ्यावेत.
- त्याच पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात फोडणी करावी.
- बारीक चिरलेला कांदा गुलाबीसर परतून घ्यावा.
- टोमॅटो मऊ शिजेपर्यंत परतून घ्यावा.
- हिरवी पेस्ट घालून परतून घ्यावी. लालतिखट, गरम मसाला घालून परतावे.
- सर्व भाज्या घालून मसाल्यावर परतून घ्याव्यात. साखर व मीठ घालावे. झाकण ठेवून मंद गॅसवर १ वाफ आणावी.
- गरम पाणी घालून पुन्हा ५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
- लिंबाचा रस, कोथिंबीर, ओल खोबर थोड घालव.
- भाजलेले तांदूळ घालून हलक्या हाताने सर्व मिक्स करावे. मध्यम गॅसवर शिजत ठेवावे.
- थोडा शिजल्यावर मंद गॅसवर पुलाव झाकून ठेवावा. म्हणजे तांदूळ चांगला फुलतो.
- कोथिंबीर व आल खोबर घालून सजावट करावी.