Print Recipe
4 in 1 summer magic || vanilla ice-cream | pineapple ice-cream | pista ice-cream | coffee ice-cream
Servings |
|
Ingredients
- 1 लिटर दूध (म्हशीचे फूल क्रीम दूध)
- 16 टेबलस्पून साखर
- 5 टीस्पून G. M. S. पावडर
- 1/4 टीस्पून C. M. C. पावडर
- 5 टीस्पून कॉर्नफ्लॉवर
- 1/4 टीस्पून व्हॅनीला इसेन्स
- 1/4 टीस्पून पायनॅपल इसेन्स
- 1/4 टीस्पून पिस्ता इसेन्स
- 1/4 टीस्पून वेलचीपूड
- हिरवा रंग
- पिवळा रंग
- पिस्ता (तुकडे करून)
- कॉफी पावडर
Ingredients
|
|
Instructions
आईस्क्रीम बेस
- एका कोरड्या भांड्यात साखर, G. M. S. पावडर, C. M. C. पावडर व कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यावे.
- गॅसवर दूध गरम करत ठेवणे. दूध थोडेसे कोमट झाल्यावर वरील कोरड्या मिश्रणात घालून एकजीव करणे. गुठळी होऊ देऊ नये.
- दूध उकळल्यावर त्यात हे मिश्रण एका बाजूने घालत ढवळत मिक्स करावे. सावकाश मिश्रण घालावे गुठळी होण्याची किंवा दूध करपण्याची शक्यता असते.
- सावकाश दूध हलवत उकळी येताच गॅस बंद करावा.
- हा आपला आईस्क्रीम बेस तयार झाला.
- हा बेस पूर्ण थंड करून घ्यावा. नंतर एका प्लॅस्टिकच्या घट्ट झाकणाच्या डब्यात हा बेस घालून फ्रीजरमध्ये १२ तासांसाठी सेट करायला ठेवावा.
- डब्याला एका प्लॅस्टिकने झाकावे व नंतर झाकण लावावे म्हणजे बर्फाचे कण आत जात नाहीत.
- हा बेस २ महिने फ्रीजरमध्ये टिकतो.
व्हॅनीला आईस्क्रीम
- एका मोठ्या पातेलीत भरपूर बर्फ घ्यावा. त्यावर एक कोरडे पातेले ठेवावे. त्यात वरील डब्यातील पाव भाग बेस घ्यावा. त्याचे छोटे तुकडे करावेत.
- बेसमध्ये पाव टीस्पून व्हॅनीला इसेन्स घालून बिटरने चांगले फेटून घ्यावे. बेस डबल झाल्यावर त्यात पाव कप फ्रेश क्रीम घालून पुन्हा फेटून घ्यावे.
- आपले व्हॅनीला आईस्क्रीम तयार आहे. हे तयार आईस्क्रीम पुन्हा १२ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवावे.
- अगदी मार्केटसारखे आपले आईस्क्रीम तयार होते.
पायनॅपल आईस्क्रीम
- पुन्हा तयार बेसचा १/४ भाग घ्यावा त्यात पायनॅपल इसेन्स १/४ टीस्पून व पिवळा रंग थोडासा घालून फेटावे. १/४ कप फ्रेश क्रीम घालून चांगले फेटून घ्यावे.
- तयार आईस्क्रीम प्लॅस्टिकच्या डब्यात काढावे व १२ तासांसाठी पुन्हा फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवावे.
- १२ तासांनंतर आपले पायनॅपल आईस्क्रीम तयार होते.
पिस्ता आईस्क्रीम
- तयार बेसचा १/४ भाग घ्यावा त्यात थोडासा हिरवा रंग, १/४ टीस्पून पिस्ता इसेन्स, १/४ टीस्पून वेलचीपूड, कापलेले पिस्ता हे सर्व घालून फेटून घ्यावे.
- १/४ कप फ्रेश क्रीम घालून पुन्हा फेटून घ्यावे. पुन्हा हे आईस्क्रीम १२ तासांसाठी प्लास्टिकच्या डब्यात घालून फ्रीजरमध्ये ठेवावे.
- १२ तासांनंतर पिस्ता आईस्क्रीम तयार होते.
कॉफी आईस्क्रीम
- तयार बेसचा १/४ भाग घ्यावा व त्यात कॉफी पावडर घालून चांगले फेटून घ्यावे. १/४ कप फ्रेश क्रीम घालून चांगले फेटून घ्यावे.
- तयार आईस्क्रीम प्लास्टिकच्या डब्यात भरून १२ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवावे.
- १२ तासांनंतर आपले कॉफी आईस्क्रीम तयार होते.
Recipe Notes
- आईस्क्रीम करताना वापरणारी भांडी कोरडी असावीत.
- बेस फ्रीजरमध्ये ठेवताना फ्रीजर फूल करावा.
- आईस्क्रीम तयार झाल्यावर म्हणजे १२ तासानंतर फ्रीजर कमी केला तरी चालेल.