Print Recipe
व्हेज - नॉनव्हेज सगळ्या रेसिपीसाठी या पद्धतीने बनवा ब्राउन कांदा.
Instructions
- कांदे साल काढून पातळ उभे चिरून घ्यावेत.
- थोड्या वेळासाठी कांदा सूती कापडावर पसरवून ठेवावा.
- कांद्यातील पाणी सुकल्यावर कांदा तळणे सोपे जाते.
- कढईत तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी रंग होईपर्यंत तळून घ्यावा. गॅस मध्यम ठेवावा.
- कांद्यातील तेल पूर्ण निथळून जाड टिशू पेपरवर कांदा काढून २० मिनिटांसाठी थंड करत ठेवावा.
- एखाद्या एअर टाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा.
- सहा महिने आपण हा कांदा वापरू शकतो.