Print Recipe
सिंधुदुर्ग मध्ये घरोघरी केली जाणारी मालवणी आंबोळी.
Instructions
- तांदुळ,उडीद डाळ आणि चणाडाळ स्वच्छ दोन वेळा धुवून घेणे.
- वेगवेगळया भांडयात आठ तास ही धान्ये तिप्पट पाणी घालून भिजत ठेवावीत.
- मेथी उडीदडाळ सोबत भिजवत ठेवावी
- आठ तासानंतर प्रत्येक धान्य वेगवेगळे मिक्सरला फिरवणे. एकदम बारीक वाटणे, वाटताना थोडेसेच पाणी घालणे.
- तयार भात सुदधा थोडेसेच पाणी घालून पेस्ट करणे
- आता सर्व मिश्रण हाताने चांगले फेटून एकत्र करणे
- मिश्रण ठेवायला मोठा डबा किंवा पातेले वापरणे
- थोडेसे तेल गरम करून त्या पीठावर घालणे व लगेचच झाकण लावणे. वर एखादे वजन ठेवणे
- थंडीच्या दिवसात पीठाचा डबा एखादया उबदार पांघरूणात बांधून ठेवणे
- दुस-या दिवषी म्हणजेच आठ दहा तासानी पीठ चांगले फर्मंट होईल, छान जाळी पडेल.
- आता या पिठात चवीनुसार मीठ घालून चांगले फेटून घेणे.
- भिडाच्या तव्याला नारळाच्या षेंडीने थोडेसे तेल लावून त्यावर एक पेला पीठ घालावे. हलक्या हाताने फिरवावे. एक मिनीटासाठी वरून झाकण ठेवावे.
- आता झाकण काढून आंबोळी परतून घ्यावी. पून्हा अध्र्या मिनीटासाठी ठेवावी. नंतर एखादया जाळीवर काढून घ्यावी.
- चटणी, चिकन, मटण, उसळ यापैकी कषासोबतही सव्र्ह करावी.