आंबोळी

Print Recipe
सिंधुदुर्ग मध्ये घरोघरी केली जाणारी मालवणी आंबोळी.
Servings
Servings
Instructions
 1. तांदुळ,उडीद डाळ आणि चणाडाळ स्वच्छ दोन वेळा धुवून घेणे.
 2. वेगवेगळया भांडयात आठ तास ही धान्ये तिप्पट पाणी घालून भिजत ठेवावीत.
 3. मेथी उडीदडाळ सोबत भिजवत ठेवावी
 4. आठ तासानंतर प्रत्येक धान्य वेगवेगळे मिक्सरला फिरवणे. एकदम बारीक वाटणे, वाटताना थोडेसेच पाणी घालणे.
 5. तयार भात सुदधा थोडेसेच पाणी घालून पेस्ट करणे
 6. आता सर्व मिश्रण हाताने चांगले फेटून एकत्र करणे
 7. मिश्रण ठेवायला मोठा डबा किंवा पातेले वापरणे
 8. थोडेसे तेल गरम करून त्या पीठावर घालणे व लगेचच झाकण लावणे. वर एखादे वजन ठेवणे
 9. थंडीच्या दिवसात पीठाचा डबा एखादया उबदार पांघरूणात बांधून ठेवणे
 10. दुस-या दिवषी म्हणजेच आठ दहा तासानी पीठ चांगले फर्मंट होईल, छान जाळी पडेल.
 11. आता या पिठात चवीनुसार मीठ घालून चांगले फेटून घेणे.
 12. भिडाच्या तव्याला नारळाच्या षेंडीने थोडेसे तेल लावून त्यावर एक पेला पीठ घालावे. हलक्या हाताने फिरवावे. एक मिनीटासाठी वरून झाकण ठेवावे.
 13. आता झाकण काढून आंबोळी परतून घ्यावी. पून्हा अध्र्या मिनीटासाठी ठेवावी. नंतर एखादया जाळीवर काढून घ्यावी.
 14. चटणी, चिकन, मटण, उसळ यापैकी कषासोबतही सव्र्ह करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *