चिकन लेअर बिर्याणी

Print Recipe
हॉटेल सारखी बिर्याणीची चव आता मिळवा घरी या पद्धतीने बनवून
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. तांदूळ स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून १/२ तासासाठी भिजत ठेवावेत.
  2. थोड्या दुधात २ वेगवेगळ्या २ फूड कलर भिजत ठेवावे.
  3. चिकन स्वच्छ धुवून पाणी पूर्ण निथळून घ्यावे. त्याला हळद, धणे - जिरेपूड, लिंबुरस, आल - लसूण पेस्ट, गरम मसाला, लालतिखट, मीठ, दही, पुदिना, कोथिंबीर लावून चांगले मिक्स करावे व १ तासासाठी झाकून ठेवावे.
  4. मोठ्या पातेल्यात ८ कप पाणी गरम करत ठेवणे त्यात सर्व खडा मसाला घालणे. मीठ, तेल, थोडीशी कोथिंबीर, पुदिना व १ हिरवी मिरची घालून पाण्याला उकळी आणणे.
  5. आता भिजवलेल्या तांदळतून पाणी काढून घ्यावे व ते उकलत्या पाण्यात घालावे. हलक्या हाताने तांदूळ ढवळावा. झाकण ठेवू नये.
  6. तांदूळ ८०% शिजवावा, पूर्ण शिजवू नये.
  7. शिजलेल्या तांदळातील पाणी पूर्ण निथळून घ्यावे. हवे असल्यास तयार भात चाळणीवर काढावा.
  8. कढई गरम करणे त्यात तेल गरम झाल्यावर कांदा मध्यम गॅसवर गुलाबी होईपर्यंत शिजवावा. कांदयासोबत थोडेसे मीठ घालावे म्हणजे कांदा लवकर तळला जातो.
  9. उकळलेल्या तेलात थोडे तूप घालावे गरम झाल्यावर टोमॅटो घालावेत व चांगले शिजवून घ्यावेत.
  10. बिर्याणी मसाला यात परतावा व मॅरीनेट केलेले चिकन मध्यम गॅसवर चांगले परतून घ्यावे.
  11. पाणी थोडेसुद्धा वापरू नये. मध्ये मध्ये हलवत चिकन पूर्ण शिजवून घ्यावे. गॅस मंद करावा.
  12. बिर्याणीला लेयर करण्यासाठी मोठे पातेले घ्यावे. त्यात पहिल्यांदा भाताचा लेयर, नंतर तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, चिकन, उकडलेल्या अंड्याचे स्लाइस यांचे थर द्यावे. पुन्हा असेच थर देऊन शेवटचा थर पुन्हा भाताचा द्यावा त्यावर कांदा, पुदिना, कोथिंबीर यांचा थर व वरुण केवडा वॉटर घालावे.
  13. वरुण मध्ये मध्ये चमच्याने खालपर्यंत होल पाडून घ्यावे. त्यात भिजवलेले कलर घालणे व होल बंद करणे. वरुण तूप सोडवे.
  14. गॅसवर तवा गरम करणे त्यावर तयार लेअरचे पातेले ठेवणे व गच्च झाकण लाऊन मध्यम गॅसवर २० मिनिटे बिर्याणी शिजवावी.
  15. एक बाजूने सावकाश काढून वाढावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *