Print Recipe
चॉकलेट आईस्क्रीम
Servings |
|
Ingredients
- 1/2 लिटर म्हशीचे दूध
- 8 टेबलस्पून साखर
- 1 टेबलस्पून G. M. S. पावडर
- 1/8 टीस्पून C. M. C. पावडर
- 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर
- 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर
- 1 टेबलस्पून कोको पावडर
- 1 टेबलस्पून ड्रिंकिंग चॉकलेट
- 1/2 टीस्पून चॉकलेट इसेन्स
- 1/2 कप फ्रेश क्रीम
Ingredients
|
|
Instructions
- साखर व सर्व पावडर कोरड्या मिक्स करून घेणे.
- दूध उकळत ठेवणे. थोडे कोमट झाल्यावर वरील मिश्रणात दूध घालून मिक्स करणे. गुठळी होऊ देऊ नये.
- उरलेल्या दुधाला उकळत ठेवावे.
- दूध उकळल्यावर वरील पावडर असलेले दूध एका बाजूने दुधात घालत दुसऱ्या बाजूने हलवत चांगले मिक्स करावे.
- कोको पावडर खाली लागून जळू शकते त्यामुळे अलगद गॅस मंद ठेवून मिक्स करावे.
- दुधाला थोडीशी उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
- मधे मधे हलवत हे दूध थंड करून घ्यावे.
- एका प्लॅस्टिकच्या डब्यात हा बेस घालून फ्रीजरमध्ये १२ तासांसाठी ठेवावा.
- १२ तासांनंतर बेस बाहेर काढून त्याचे छोटे तुकडे करावे.
- एका मोठ्या पातेलीत भरपूर बर्फ घ्यावा. त्यावर दुसरे कोरडे पातेले ठेवावे.
- त्यात हा बेस १/२ टीस्पून चॉकलेट इसेन्स घालावे व भरपूर फेटून घ्यावे.
- वरील मिश्रणात १/२ कप फ्रेश क्रीम घालून पुन्हा फेटून घ्यावे.
- प्लॅस्टिकच्या डब्यात भरून १२ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवावे.
- १२ तासांनंतर आपले चॉकलेट आईस्क्रीम तयार होते.