Print Recipe
माझ्या सासूबाईंच्या रेसिपी ने बनवलेली फणसाची चविष्ट भाजी
Servings |
|
Ingredients
- 1 मोठा बाऊल कच्चा फणस (गरे)
- 1 कप आठळया/घोट्या
- 3 हिरवी मिरची
- 1/4 इंच आल
- 1 कप ओल खोबर
- मीठ
- 1 टीस्पून साखर
- 1 टीस्पून मोहरी
- 1/4 टीस्पून हिंग
- 1 टेबलस्पून तेल
Ingredients
|
|
Instructions
- फणस सोलण्या अगोदर हाताला व सुरीला तेल लावणे म्हणजे हाताला डिंक लागत नाही व सोलणे सोपे जाते.
- फणसाची सगळी चारखंड वेगळी करून गरे बाजूला करणे व त्याचे तुकडे करून घेऊन फणस पाण्यात ठेवणे.
- घोट्या दगडाने ठेचून त्याची साल काढणे व पाण्यात ठेवणे.
- आल व मिरची मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवणे.
- पातेलीत तेल गरम करणे त्यावर मोहरीची फोडणी करणे. मोहरी तडतडली की हिंग व आल-मिरचीच वाटण घालून थोडे परतून घेणे.
- हळद व ठेचलेल्या घोट्या घालून परतून घेणे. १/२ पेला पाणी घालून झाकण ठेवून ५ मिनिटांसाठी घोट्या शिजवून घ्याव्यात.
- आता गरे घालावेत त्यावर मीठ व साखर घालून पातेलीवर झाकण ठेवावे. झकणावर पाणी ठेवावे.
- वाफेवर ५ मिनिटांसाठी मंद गॅसवर भाजी शिजवावी.
- झाकण उघडून भाजी एकदा ढवळून घ्यावी व पुन्हा झाकून १ वाफ आणावी.
- ओल खोबर घालून मिक्स करवे व भाजी सर्व्ह करावी.
Recipe Notes
- कच्चा फणस सोलल्यानंतर लगेचच भाजी करावी नाहीतर गरे कडू होतात.
- भाजीत पाणी जास्तीचे घालू नये भाजी चिकट होते.
- भाजीसाठी शक्यतो रसाळ फणस वापरावा.
- सोललेले गरे लगेच वापरायचे नसतील तर हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे आठवडाभर चांगले राहतात.
Good going and really hard work.