Print Recipe
मालवणी स्पेशल गरम मसाला
Instructions
- सर्व मसाले स्वच्छ चालून वेचून घ्यावेत.
- मसाल्यांना १ ऊन दाखवावे.
- गॅसवर कढई गरम करणे त्यात प्रथम धणे कोरडेच भाजून घ्यावेत.
- जिरे व दगडफुल हे देखील कोरडेच भाजून घ्यावे.
- कढईत थोडे तेल गरम करून बाकी सर्व मसाले एक एक करून तेलात हलके तळून घ्यावेत.
- तेल पूर्ण निथळून मसाले कोरडे करावेत.
- सर्व मसाले मिक्स करून थंड करून घ्यावेत.
- थोडे थोडे मसाले मिक्सरला छान बारीक वाटून घ्यावेत. चाळणीने चालून घ्यावे. राहिलेला जाडसर मसाला पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घ्यावा.
- तयार मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवावा.