Print Recipe
खिचडी चिकट होतेय? तर मोकळी आणि मऊसूत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी या ट्रिक्स वापरा.
Instructions
- साबूदाणा वेचून २ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
- साबूदाण्याच्या वर थोडेसे पाणी येईल अशाप्रकारे साबूदाणा भिजत घालावा (५ तास).
- छान फुललेल्या साबूदाण्यात साखर, शेंगदाणा कूट, ओल खोबर, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावी.
- अशाप्रकारे मिक्स केल्यामुळे खिचडी चिकट होत नाही.
- फोडणीसाठी कढईत तूप गरम करणे त्यात जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता घालणे व मिरची थोडीशी परतून घ्यावी.
- बटाट्याच्या काचऱ्या घालून परतून घेणे.
- बटाट्याला लागेल एवढेच थोडेसे मीठ घालावे.
- बटाट्यावर झाकण ठेवून बटाटा ५ मिनिटांसाठी शिजवून घ्यावा.
- साबूदाण्याचे मिश्रण घालून व्यवस्थित परतून घेणे व कोथिंबीर घालणे.
- झाकण ठेवून ५ मिनिटांसाठी खिचडी वाफवावी म्हणजे साबूदाणा छान फुलतो.
- खिचडी एकदा हलवून पुन्हा २ मिनिटांसाठी वाफ काढावी व सर्व्ह करावी.