झटपट सांबार

Print Recipe
झटपट सांबार
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. तुरडाळ व मुगडाळ एकत्र करून २ पाण्याने स्वच्छ धुवावी व १/२ तास पाण्यात भिजत ठेवावी.
  2. भिजलेली डाळ कुकरच्या डब्यात घालावी त्यात हळद घालावी व १ कप पाणी घालावे.
  3. कुकरच्या दुसऱ्या डब्यात वांग, बटाटा, टोमॅटो, कांदा व शेवग्याच्या शेंग एकत्र करून त्यात १ कप पाणी घालावे.
  4. डाळ खाली व भाजीचा डबा वर असे एकावर एक डबे ठेवून कुकरला ४ शिट्टया करून घ्याव्यात.
  5. शिजलेली डाळ गरम असतानाच घोटून घ्यावी म्हणजे चांगली एकजीव होते.
  6. गॅसवर पातेले गरम करून घ्यावे त्यात तेल घालून मोहरी, कढीपत्ता, मिरची,मेथी, व हिंग यांची फोडणी करावी.
  7. हिरवा मसाला व सांबर मसाला घालून चांगले परतून घ्यावे.
  8. वरील फोडणीत डाळ घालून परतावी.
  9. शिजलेल्या भाज्या, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर घालून परतावे व १० मिनिटे गॅस मंद करून सांबर शिजू द्यावे.
  10. थोड्या वेळाने सांबर शिजून घट्टसर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *