Print Recipe
झटपट तयार होणारी पाचक सोलकढी
Servings |
4 Person
|
Ingredients
- १ कप ओल खोबर
- ४ - ५ लसूण पाकळ्या
- २ हिरव्या मिरच्या
- ५ - ६ कोकम
- १ टीस्पून जिरे
- १/४ टीस्पून साखर
- मीठ
- कोथिंबीर बारीक चिरून
Ingredients
|
|
Instructions
- प्रथम कोकम आपण मीठ घालून कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. त्यामुळे त्याचा सगळा आगळ निघेल व सोलकढीला रंग येईल.
- मिक्सरच्या भांड्यात ओल खोबर, लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे व साखर सर्व एकत्र फिरवून घेणे. १ वाटी पाणी घालणे.
- एक बाऊलमध्ये भिजवलेले कोकम घेणे त्यात एखाद्या गळणीने सर्व रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे.
- राहिलेल्या चोथ्यात पुन्हा १ वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घेणे व गाळून घेणे.
- कोथिंबीर व थोडेसे मीठ टाकून सर्व्ह करावे.
Recipe Notes
खोबर जर फ्रीजमध्ये ठेवलेल असेल तर मिक्सरला फिरवताना त्यात कोमट पाणी घालावे म्हणजे रस चांगला निघतो.